जेऊर येथील युवक श्रीधर पाथ्रुडकर याचे निधन
जेऊर, दि. 8 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथील रहिवासी आणि सध्या पुण्यात स्थायिक असलेले श्रीधर प्रदिप पाथ्रुडकर (वय-27) या युवकाचे हृदयविकाराच्या झटक्याने पुणे येथे निधन झाले.
त्याच्या पश्चात आई, वडील, आजी, चुलती, चुलते असा परिवार कै.श्रीधर हा प्रदिप पाथ्रुडकर यांचा एकुलता एक मुलगा होता. तसेच ग्रामपंचायत सदस्य उमेश पाथ्रुडकर यांचे चुलत बंधू तर स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे सचिव प्रशांत पाथ्रुडकर यांचा पुतन्या होता.