जेऊर येथील सुहास गायकवाड यांचा जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते ‘युवा कलाभूषण’ पुरस्काराने सन्मान
जेऊर, दि. १२ (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथील
नाट्य व चित्रपट अभिनेता सुहास गायकवाड यांचा युवा कलाभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठान, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईतील उल्हासनगर येथे पार पडला
जेऊर येथील सुहास सुनिल गायकवाड यांनी शालेय जीवनापासून कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नाटक, एकांकीका, शाॕर्ट फिल्म आदींमध्ये अभिनय करून अष्टपैलू कलाकार म्हणून काम केल्या बद्दल जेष्ठ अभिनेते अशोक सराफ व अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या हस्ते ‘युवा कलाभूषण पुरस्कार २०२४’ ने सन्मानीत करण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमाला संस्थापक, अध्यक्ष प्रकाश सोमनाथ जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.