जेऊर येथील सुलभा देशपांडे यांचे निधन

जेऊर, दि. २० (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील सुलभा दत्तात्रय देशपांडे (वय ८१) यांचे वृध्दपकाळाने आज निधन झाले आहे.जेऊर येथील भारत हायस्कूलचे सेवानिवृत्त क्रिडा शिक्षक दत्तात्रय देशपांडे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सोलापूर जनता बँकेचे मॕनेजर दिपक देशपांडे, पत्रकार दिनेश देशपांडे आणि डॉ उमेश देशपांडे यांच्या त्या मातोश्री होत्या.
अंत्यविधी उद्या शुक्रवारी सकाळी सकाळी ९.०० वाजता होणार आहे. त्यांच्या निधनाबद्दल जेऊर परिसरातील नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे.