17/12/2024

जेऊरच्या लिटिल एंजल्स स्कूल मध्ये आज बाल महोत्सवाचे आयोजन ; सेंद्रिय भाजीपाला आणि फळे राहणार आकर्षण

0
IMG_20240113_082509.jpg

जेऊर, दि. 13 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथे आज 13 जानेवारीला जय मातृभूमी सांस्कृतिक आणि शैक्षणिक संघ संचलित लिटिल एंजल्स स्कूल आणि अटल ज्ञान प्रबोधिनी या शाळेमध्ये जिजाऊ जन्मोत्सव आणि स्वामी विवेकानंद जन्मदिन यानिमित्ताने बाळ गोपाळांच्या संक्रांति निमित्त आवश्यक असणाऱ्या वस्तूंचा छोटा बाजार “बाल महोत्सव” आयोजित करण्यात आला होता.

या महोत्सवामध्ये सर्वप्रकारच्या सेंद्रिय भाजीपाला फळे आणि धान्ये ही सेंद्रियच असतील असा अट्टहास धरून तशाच वस्तू विक्रीस ठेवण्यात येणार आहे. आज-काल समाजामध्ये विषमुक्त अन्नयाकडे जो वाढता ओढा आहे त्याला अनुसरून ही गोष्ट करण्यात आली. यामध्ये सर्व सेंद्रिय भाजीपाला, सेंद्रिय फळे, सेंद्रिय डाळी ज्या मुलांच्या घरच्या शेतातीलच आहेत अशाच विक्रीस ठेवण्यात येणार आहे. या वैशिष्ट्यपूर्ण बाजारामध्ये प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळण्यात येणार आहे. यासोबतच काही विद्यार्थ्यांनी तयार करून आणलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अन्नपदार्थांचा सर्वांनी मनसोक्त आस्वाद ग्राहक घेऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page