08/06/2025

जेऊरच्या न्यू इरा पब्लिक स्कूलमध्ये हळदी-कुंकू समारंभ संपन्न

0
IMG-20250205-WA0015.jpg

जेऊर, दि. ५ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील न्यू इरा पब्लिक स्कूलमध्ये महिला व पालक यांचे हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जेऊर येथील डॉ. शारदा सुराणा यांच्या उपस्थितीत राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी महिलांनी आपल्या सुप्त गुणांचे प्रकटीकरण करण्याचा प्रयत्न केला. काहींनी, उखाणे, गाणे, भारुडे यांचे सादरीकरण केले.

त्या नंतर डॉ शारदा सुराणा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. खास महिलांसाठी असा मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल न्यू इरा पब्लिक स्कूल चे सर्वांनी आभार मानले. कार्यक्रम अधिक रंगतदार झाला तो महिलांसाठी आयोजित केलेल्या ” घे भरारी- खेळ रंगला पैठणीचा यामध्ये संगीत खुर्ची, जोडी जोडीची उठाबशी, फुगा फुगवून त्यावर बसून फोडणे अशा खेळांचा समावेश होता. यामध्ये सर्वच महिलांनी अगदी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

विजयी माहिला पुढीलप्रमाणे-
१) प्रथम क्रमांक- पूजा बाळू मत्रे (जेऊर)- पैठणी
२) द्वितीय क्रमांक- तेजा सर्जेराव कर्चे (जेऊर)- भेट वस्तू
३) तृतीय क्रमांक- पूजा रोकडे (वांगी-३)- भेट वस्तू

या विजेत्या महिलांना शाळेच्या सर्व महिला शिक्षकांच्या हस्ते बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आले. विजेत्या महिलांचे सर्वांनी अभिनंदन केले. सर्व महिला पालकांना वान देण्यात आले.

यावेळी अवसरे मॅडम व चव्हाण मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर घाडगे मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व महिला शिक्षक व महिला शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page