जेऊर येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी


जेऊर, दि. ११ (करमाळा-LIVE)-
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रक्तदान शिबिराचे उद्घाटन हे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन सरपंच पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक श्री टिळेकर, उपसरपंच नागेश झांजुर्णे, भास्कर कांडेकर, अनिल गादिया, रोहिदास सातव, धनंजय शिरसकर, संदीप कोठारी, विनोद गरड, सागर भगत, सुयोग दोशी, उमेश मोहिते, इकबाल पठाण, उमेश कांडेकर, उमेश निर्मळ, तुषार किरवे, शांताराम सुतार, बापू घाडगे, राकेश गरड, शुभम कोठावळे, योगेश कर्णवर, सचिन निमगिरे, संतोष वाघमोडे, तसेच सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व जेऊर ग्रामस्थ उपस्थित होते.
जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ७९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सदर कार्यक्रमासाठी सकल माळी समाज व जेऊर ग्रामस्थ तसेच राष्ट्रीय समर्पण पुरस्कार विजेते महेश रणदिवे यांनी परिश्रम घेतले.




