जेऊर मुस्लिम समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन
जेऊर, दि. 26 (करमाळा-LIVE)-
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने करमाळा तालुक्यातील जेऊर येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी जेऊर येथे मुस्लिम समाजातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जेऊरचे ग्रामपंचायत सदस्य मुबारक फकीर, रहेमान पठाण, शफीक पठाण, रमजान शेख, मुजाहीद फकीर, रमीज शेख हे उपस्थित होते.