07/06/2025

जेऊर येथे माता रमाई यांची जयंती साजरी

0
IMG-20230208-WA0035.jpg

जेऊर, दि. 9 (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील पंचशील बौद्ध विहार येथे माता रमाई जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी लहान मुलींनी माता रमाईंवर भाषणे केली. माझ्या ‘भिमाची सावली दिनदलीतांची आई, अशी भाग्यशाली त्यागमूर्ती माझी रमाई” असे म्हणतात कि प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या यशात एका स्त्री चा सिंहाचा वाटा असतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशाच्या मागे राजमाता जिजाऊ यांचा सिंहाचा वाटा होता, ज्योतिबा फुले यांच्या यशस्वी जीवन कार्यामागे सावित्रीमाई फुले यांचा सिंहाचा वाटा आहे तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामध्ये त्यागमुर्ती रमाई यांचा सिंहाचा वाटा आहे. माता रमाई कष्टाळू मेहनती व प्रेमळ होत्या त्यांनी आपल्या आशा अपेक्षांचा त्याग करुन लोखो दीन दुबळ्यांना स्वाभिमानाची शिकवण देणाऱ्या म्हणजेच रमाई होय पोटची चार मुल वारली तरी त्यांनी सामाजिक कार्य सोडले नाही व आपल्या रमाईंचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 मध्ये झाला अशा त्यागमुर्ती रमाई मातेला जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

यावेळी जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्ष पल्लवी शिंदे, प्रियांका खटके, मिनाक्षी पाटील, हर्षदा देशमाने, पोलिस संरक्षण संघटनेचे तालुका निरीक्षक माया कदम, मनिषा गरड, उषा गरड, शितल गरड, अंजली गरड, वंदना गरड, अर्चना भोसले, आरोही गरड, दिया गरड, सानिका गरड, सोनाली कदम, अश्विनी गरड, स्नेहा गरड, आनंदी गरड, गणेश गरड, विवान गरड, आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page