जेऊरात उद्या श्रीरामनवमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

करमाळा, दि. २५ (करमाळा-LIVE)-
श्रीरामनवमी उत्सव समितीच्या वतीने श्रीरामनवमी निमित्त गुरुवार दि. २६ मार्च रोजी जेऊर गावातून श्रीरामनामाच्या गजरात भव्यदिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
जेऊर शहराच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक वैभवात भर घालणारी रामनवमी शोभायात्रा उत्सवात साजरी करण्याचे आयोजन श्रीरामनवमी उत्सव समिती वतीने करण्यात आले आहे. मारूती मंदिर येथून सकाळी ७.३० वाजता शोभयात्रा निघणार आहे. सकाळी १० वाजता हभप सुरज महाराज अंतरवडीकर यांचे किर्तन होणार असून श्रीराम मूर्तींचे पूजन करून दुपारी १२ वाजता श्री हनुमान मंदिर येथे महाआरती चे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महाप्रसादाचे आयोजन ही करण्यात आले आहे. तसेच या शोभायात्रेमध्ये विविध पारंपरिक वाद्ये, बँड पथक आणि शहर व तालुक्यातील विविध भजनी मंडळ, टाळकरी मंडळ असणार आहेत. श्रीरामनवमी निमित्त होणाऱ्या या शानदार सोहळ्यामध्ये तालुक्यातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त पणे सहभागी व्हावे असे आवाहन श्रीरामनवमी शोभायात्रा समितीने केले आहे.





