जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

जेऊर, दि. ३ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने संपर्क कार्यालयामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली.
यावेळी जेऊर शहराध्यक्ष अतुल निर्मळ म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त मरणोत्तर भारतरत्न देऊन केंद्र सरकारने सन्मानीत केलं पाहिजे. अण्णाभाऊ साठे मराठी मातीत जन्मलेलं एक अनमोल रत्न म्हणजे अण्णा भाऊ साठे यांचा जन्म १ ऑक्टोबर १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला.अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक, साहित्यिक, लोककवी आणि श्रमिक वर्गाचे प्रतिनिधी होते. त्यांच्या जीवनाचे आणि कार्याचे स्वरूप सामाजिक परिवर्तनासाठी झटणारे होते. त्यांचा संपूर्ण जीवनपट हा दलित आणि शोषित वर्गाच्या उत्थानासाठी प्रेरणादायक आहे.
अण्णाभाऊंचे बालपण अत्यंत गरीबीमध्ये गेले. ते मातंग समाजात जन्मले होते, जो त्या काळी सामाजिक दृष्ट्या मागास आणि अस्पृश्य मानला जात असे. शिक्षण फारसं झालं नाही, पण आयुष्यातील संघर्ष आणि अनुभवांनी त्यांना जगाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी दिली. लहान वयातच कामासाठी मुंबईत स्थलांतर केले, जिथे त्यांनी अनेक मजुरीची कामं केली.
अण्णाभाऊ साठे हे लोकशाहीर म्हणून ओळखले जातात. त्यांनी विविध प्रकारचे साहित्य निर्माण केले. लोकनाट्य सामाजिक अन्याय, वर्गसंघर्ष, स्त्रियांचे शोषण यावर भाष्य करणारे. कथासंग्रहः श्रमिक आणि दलितांच्या जीवनावर आधारित. कादंबऱ्या फकिरा ही त्यांची सर्वात प्रसिद्ध कादंबरी, गाणी आणि पोवाडे अन्यायाविरुद्ध लढा देणारे. त्यांच्या साहित्यातून समाजाच्या तळागाळातील लोकांचे दुःख, त्यांची आशा आणि संघर्ष उभा राहतो. दलित चळवळीचे नेतृत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन अण्णाभाऊ साठे यांनी दलितांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उत्थानासाठी कार्य केले.जग बदल घालुनी घाव मज सांगून गेले भीमराव या उक्तीप्रमाणे श्रमिक संघटनांमध्ये त्यांनी मुंबईतील कापड गिरणी कामगारांसाठी संघर्ष केला.
यावेळी उपस्थित पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष नितीन खटके, निलेश पाटील, पांडुरंग घाडगे, धन्यकुमार गारुडी, अतुल निर्मळ, आदिनाथ माने, सोमनाथ जाधव, सागर साखरे, सागर कोठावळे, सागर बनकर, अजित उपाध्ये, उमेश मोहिते, सचिन गारुडी, विठ्ठल जाधव, अविनाश घाडगे इत्यादी उपस्थित होते.