नूतन हँडबॉल असोसिएशनचा खेळाडू ओंकार लबडेची आंतरराष्ट्रीय कॉमनवेल्थ हँडबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

जेऊर, दि. १६ (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बातमी असून शेटफळचा आणि नूतन करमाळा तालुका हँडबॉल असोसिएशन खेळाडू ओंकार ज्ञानदेव लबडे याची भारतीय हँडबॉल संघात निवड झाली आहे.
मालदीव येथे दि. १६ ते २३ सप्टेंबर २०२५ या कालावधीत होणाऱ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कॉमनवेल्थ हँडबॉल स्पर्धेत तो भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
ओंकार हा लहान पणापासून भारत हायस्कूल जेऊर इथे शिक्षण घेत होता वयाचा १४ वर्षांपासून तो हँडबॉल खेळत आहे राज्य व राष्ट्रीय पातळीवर देखील तो खेळला आहे या साठी विनोद गरड राष्ट्रीय प्रशिक यांचे मार्गदर्शन मिळत होते.
करमाळा तालुक्यातील हा पहिला आंतरराष्ट्रीय हँडबॉल खेळाडू ठरला असून, ही निवड हँडबॉल असोसिएशन इंडियाचे सहसचिव रुपेश दादा मोरे व हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्रचे महासचिव राजाराम राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
या ऐतिहासिक कामगिरीबद्दल आमदार नारायण आबा पाटील, माजी सभापती अतुल भाऊ पाटील, सरपंच पृथ्वीराज पाटील, उपसरपंच नागेश झांजुर्णे, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. अर्जुनराव सरक, पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर, माजी सरपंच अनिलकुमार गादिया, माजी सरपंच भास्कर कांडेकर, नूतन करमाळा तालुका हँडबॉल असोसिएशन जेऊरचे अध्यक्ष संतोष नुस्ते, सहसचिव दत्तात्रय वाघमोडे यांनी अभिनंदन केले आहे. संघाच्या कामगिरीत सचिव विनोद गरड यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
करमाळा तालुक्याच्या क्रीडांगणावरील ही ऐतिहासिक निवड तालुक्यातील सर्व आजी-माजी खेळाडूंसाठी अभिमानाची ठरली आहे.