जेऊरकरांचा जीवघेणा प्रवास थांबता थांबेना- हुतात्मा एक्सप्रेसला थांबा हवाच


जेऊर, दि. 22 (करमाळा-LIVE)-
जेऊरकरांचा जेऊर ते पुणे जीवघेणा प्रवास थांबता थांबेना झाला असून हुतात्मा एक्सप्रेसला थांबा मिळाला तर हा जीवघेणा प्रवास थांबू शकतो, त्यामुळे हुतात्मा जेऊर स्टेशनवर थांबा देणे गरजेचे आहे.
जेऊर मधून पुण्याला जाण्यासाठी सकाळी 6.15 ला हैद्राबाद-मुंबई एक्सप्रेस आहे. 1 फेब्रुवारी पासून सदरील एक्सप्रेस सुपरफास्ट करण्यात आली. गाडीचे स्लीपर डब्बे दहा वरून दोन करण्यात आले आणि एसी डब्बे वाढविण्यात आले. दरम्यान जेऊर परिसरातील 28 गावातील शेकडो नागरिक दररोज पुण्याला ये-जा करतात. हैद्राबाद-मुंबई एक्सप्रेस मधील स्लीपर डब्बे कमी झाल्यामुळे गर्दी वाढलेली असून जेऊरकरांचा प्रवास जीवघेणा झालेला आहे.
काल जेऊर रेल्वे स्टेशन प्रबंधक यांना हुतात्मा एक्सप्रेसला थांबा मिळावा यासाठी सर्व पक्षीय, संघटनाकडून मोर्चा काढण्यात आला, मोर्चाला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी 21 दिवसांच्या आता हुतात्मा ला थांबा मिळाला नाहीतर रेल रोको करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
हे दुसरे आंदोलन.
डॉ. सुभाष सुराणा, सामाजिक कार्यकर्ते
एक आवाहन आणि
हजारो ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
अतिशय शांततेत.
शहरात न मागता मुलभुत सुविधा.
ग्रामीण आक्रोश.
आणि आमचे आवाहन आणि हा बांध फुटला.
मात्र संयम नाही तुटला.
एक रेल्वे आणि ४डबे.
प्रवासी शेकडो.
जणू मेंढरे कोंबली.
हे सहनशक्ती चे बाहेर.
ही तर झलक.
पुढे रेल्वे रोको ची आंधी.
हिंसक वळणं नको ही भिती राहीली नाही.
हा हजारोंचा जमाव,
एक शांततेचं आवाहन आणि
पिन ड्राॅप सायलेन्स.
सर्व सहभागी प्रवासी, ग्रामस्थ, महिला ,सर्व नेते मंडळी , कार्यकर्ते आणि सतत मेहनत घेणारा सुहास आणि त्याला मदत करणारे. सर्व पत्रकार मंडळी
नमोल्लेख नाही करीत कारण….
खूप आभारी आणि कृतज्ञ.
मोठे आंदोलन यश मिळवून देते.
आता पुन्हा दिल्लीत जावून ठिय्या.
खासदार साहेबांच्या कडे या मतदार संघाची एकच मागणी हुतात्मा थांबवा आणि हैद्राबाद चे स्लीपर कोच वाढवा.
हे मान्य होईल.
नाही झाले तर चक्री उपोषण
आणि शेवटी रेल रोको.
खासदार, सर्व आजी, माजी आमदार,
आणि आपलाच नागराज च्या नेतृत्वाखाली.
पुन्हा सहभागा बद्दल आभार.



