अमृत भारत योजनेत जेऊर रेल्वे स्टेशनचा खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यामुळे समावेश- भाजप तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांची माहिती
जेऊर, दि. 3 (करमाळा-LIVE)- जेऊर रेल्वे स्टेशनचा समावेश अमृत भारत योजनेत करण्यात आला आहे, माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पाठपुरावा करून जेऊर रेल्वे स्थानक हे अमृत भारत योजनेत समाविष्ट केले आहे. त्यामुळे जेऊर रेल्वे स्थानकास जास्तीत जास्त निधी मंजूर करण्यात यावा, या रेल्वे जेऊर स्थानकासाठी भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, रेल्वे प्रवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील, करमाळा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुहास सुर्यवंशी, रवी माळवे यांनी सोलापूर येथे डी.आर.एम निरज डोहारे साहेब यांना भेटून जेऊर रेल्वे स्थानकास अमृत भारत योजने अंतर्गत प्लॅटफॉर्म निवारा शेड, कोच इंडिकेटर तसेच तिकीट खिडकी शेजारी दुसरा फुट ओव्हर ब्रिज तयार करण्यात यावा या आशयाचे निवेदन दिले आहे.
लवकरच जेऊर रेल्वे स्टेशन हे प्रवासांसाठी सर्व सोयी सुविधा युक्त होईल, तसेच तालुक्यातील प्रवाशांच्या प्रवासाठी सोयिची असणारी हुतात्मा एक्स्प्रेसला लवकरच थांबा मिळवून देऊ असेही खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सांगितले आहे. अशी माहिती भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी दिली.