जेऊर रेल्वे स्टेशन समस्यांच्या विळख्यात, विविध मागण्या त्वरित पूर्ण करा- विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार यांना दिले निवेदन
जेऊर, दि. ४ (करमाळा-LIVE)- जेऊर रेल्वे स्टेशनच्या विविध मागण्यांसाठी सोलापूरचे विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार डोहारे यांधा प्रवासी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
काल नीरज कुमार यांनी जेऊर रेल्वे स्टेशनला भेट दिली. यावेळी प्रवासी संघटना व जेऊर ग्रामपंचायत यांच्यातर्फे हुतात्मा व उद्यान एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळणे बाबतचे निवेदन देण्यात आले. याबाबत प्रशासन सकारात्मक विचार करत आहे असे सांगण्यात आले. बेंगलोर-मुंबई उद्यान एक्सप्रेस ला जेऊरला थांबा देण्यात येईल असे सांगितले, प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर जनरल तिकीट काढण्यासाठी एटीव्हीम मशीन बसवली जाईल, जेऊर रेल्वे स्थानकावरील आरक्षण खिडकी सकाळी ८ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत चालू ठेवावी अशी मागणी करण्यात आली.
जेऊर रेल्वे स्थानकावरून सकाळच्या हैदराबाद मुंबई सुपरफास्ट या गाडीला प्रचंड गर्दी होत असून प्रवासी दारात लटकून जात आहेत त्यामुळे थांबा देण्यात यावा अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
यावेळी सरपंच पृथ्वीराज पाटील, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुहास सुर्यवंशी, उपाध्यक्ष प्रवीण करे, अल्लाउद्दीन मुलाणी, अनिल गादिया, मुबारक फकीर, संदीप कोठारी, विनोद गरड, भूषण लंकड, लतिफ तांबोळी, पोपट माने, प्रदीप पवार, दिनेश देशपांडे, आकाश पवार, रमिज शेख, दत्ता मारकड आदी उपस्थित होते.