18/12/2024

साडे ग्रामपंचायतला विकासात्मक कामात नेहमीच सहकार्य राहील- माजी आमदार नारायण आबा पाटील

0
IMG-20230815-WA0038.jpg

जेऊर, दि. 15 (करमाळा-LIVE)-
साडे ग्रामपंचायतला विकासात्मक कामात नेहमीच सहकार्य राहील असे मत माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी व्यक्त केले आहे.

जेऊर येथील नियोजित सत्कार समारंभात ते बोलत होते, साडे ग्रामपंचायतच्या सरपंच पदी अण्णासाहेब आडेकर यांची निवड करण्यात आल्याबद्दल श्री पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित उपसरपंच मंगलताई पाटील, ग्रामपंचायत सदस्य अजिंक्य पाटील, श्रीपती काशिद, सोनाली खराडे, ज्ञानेश्वर तुपे, योगेश लोंढे, सचिन रोकडे, अक्षय पाटील, नागेश लाळगे यांचे सत्कार करण्यात आले. यावेळी भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. अर्जून सरक, युवानेते पृथ्वीराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य संदीप कोठारी, संतोष वाघमोडे, माजी उपसरपंच राजाभाऊ जगताप आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी आमदार पाटील म्हणाले की, करमाळा तालुक्यातील पूर्व भागात सिंचन क्षेत्र वाढवण्यात आपल्याला यश आले. यापुढे साडे गावासह पूर्व भागातील सर्व ग्रामपंचायतींना शासनाकडून निधी मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करत राहणार. या भागातील नागरीकांना चांगल्या ग्रामसुविधा मिळाव्यात, भौतिक सुविधा सह गावातील आरोग्य, ग्रामस्वच्छता, गावांतर्गत रस्ते, वाडी वस्तीवरील रस्ते, पिण्याचे पाणी आदिसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष निधीची मागणी करुन मंजूरीसाठी पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. उपस्थितांचे आभार स्वीय सहायक सूर्यकांत पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page