शिवजन्मोत्सव: जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन तर शिव जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आदिनाथ माने

जेऊर, दि. 16 (करमाळा-LIVE)-
जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्तानं विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तर जेऊर शिव जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आदिनाथ माने यांची निवड करण्यात आली आहे.
जेऊर संभाजी ब्रिगेडच्यावतीने मध्यवर्ती शिव जन्मोत्सव समिती तर्फे 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी जिजाऊ ब्रिगेडच्या महिला दीपोत्सव साजरा करणार असून 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांचे पूजन आजी-माजी सैनिक, माता-भगिनी व शासकीय अधिकारी यांच्या हस्ते होणार आहे.
आज जेऊर येथे संभाजी ब्रिगेड प्रणित मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीची बैठक संभाजी ब्रिगेडच्या संपर्क कार्यालयात पुणे विभागीय कार्याध्यक्ष नितीन खटके यांच्या मार्गदर्शना खाली पार पडली.
रविवारी 26 फेब्रुवारी रोजी भव्य मिरवणूक सोहळा पारंपारिक पद्धतीने पार पडणार आहे. पुढीलप्रमाणे मिरवणूक होणार आहे.
1) शेटफळ येथील सर्व ग्रामस्थ मुलांचे लेझीम पथक
2) योद्धा करिअर अकॅडमी झरे 60 मुला-मुलींचे लेझीम पथक
3) जगदंब जिजाऊ प्रतिष्ठान 60 मुलींचे ढोल पथक सोलापूर
4) श्री संत हरी बाबा वारकरी शिक्षण संस्था कोर्टी 50 मुले यांची पायी वारी
5) शिवनेरी मर्दानी आखाडा व झांज पथक (60 करकम)
6) शिवरत्न मर्दानी आखाडा (30 करकम)
7) स्वराज्य मर्दानी खेळ (30) केम
8) बाबुळगावं येथील हलगी पथक
शिव जयंती उत्सव समिती कार्यकारणी पुढीलप्रमाणे-
अध्यक्ष- शिवश्री आदिनाथ माने
उपाध्यक्ष– शिवश्री अर्जुन आवारे
मिरवणूक प्रमुख– शिवश्री वैभव मोहिते
मिरवणूक उपप्रमुख– शिवश्री चंद्रहास शिरस्कर
कार्यध्यक्ष- शिवश्री अभिजीत म्हमाणे
सचिव– शिवश्री अमित संचेती
कोषाध्यक्ष– शिवश्री धनंजय निमगिरे
खजिनदार– शिवश्री राहुल जगताप
सहखजिनदार– शिवश्री रामहरी तोरमल
प्रसिद्धी प्रमुख-शिवश्री समाधान जाधव
यावेळी नितीन खटके, बालाजी गावडे, राकेश पाटील, सुहास शिंदे, अतुल निर्मळ, निलेश पाटील, हेमा शिंदे, पिंटू जाधव, विठ्ठल मोहिते, सचिन निर्मळ, अविनाश घाडगे, पिंटू जाधव, सागर लोंढे, गणेश मोरे, शलमोन केसकर, सचिन गारुडी, सुभाष जगताप, पांडुरंग तोरमल, मयुर मोहिते, राहुल तोरमल, बाळासाहेब कर्चे, लतेश घनवट, रणजित कांबळे, बाळासाहेब तोरमल, धनु गारुडी आदि उपस्थित होते.

