जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कावळवाडी येथे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

जेऊर, दि. १७ (करमाळा-LIVE)-
युवानेते आणि जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कावळवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.
यावेळी सरपंच पृथ्वीराज पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अप्पासाहेब शेजाळ, हभप दिपक महाराज कावळे, प्रवीण शेजाळ तसेच ग्रामस्थ विध्यार्थी उपस्थित होते.