जेऊर मध्ये उद्या श्रीरामनवमीला श्रीरामनामाच्या गजरात निघणार भव्य-दिव्य शोभायात्रा
करमाळा, दि. 29 (करमाळा-LIVE)-
श्रीरामनवमी उत्सव समितीच्या वतीने श्रीरामनवमी निमित्त गुरुवार दि. 30 मार्च 2023 रोजी जेऊर गावातून श्रीरामनामाच्या गजरात भव्यदिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
करमाळा शहराच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक वैभवात भर घालणारी रामनवमी शोभायात्रा उत्सवात साजरी करण्याचे आयोजन श्रीरामनवमी उत्सव समिती वतीने करण्यात आले आहे. गोविंदबापू नगर मधील सागर बिल्डिंग येथील गणपती मंदिरातून सकाळी 8.45 वाजता शोभयात्रा निघणार आहे. श्रीराम मूर्तींचे पूजन करून दुपारी 12 वाजता श्री हनुमान मंदिर येथे महाआरती चे आयोजन करण्यात आले आहे. या शोभायात्रेमध्ये विविध पारंपरिक वाद्ये, बँड पथक आणि शहर व तालुक्यातील विविध भजनी मंडळ, टाळकरी मंडळ असणार आहेत. श्रीरामनवमी निमित्त होणाऱ्या या शानदार सोहळ्यामध्ये तालुक्यातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त पणे सहभागी व्हावे असे आवाहन श्रीरामनवमी शोभायात्रा समितीने केले आहे.
30 मार्च 2023 (रामनवमी)
शोभायात्रा व पालखी सोहळा रुपरेषा-⭕गणपती मंदिर(सागर बिल्डिंग) येथे सर्व श्रीराम भक्तांनी सकाळी ठिक 8.00वा जमायचे आहे
⭕सकाळी 8.30 वा पालखी सोहळ्याचे व भगव्या ध्वजाचे सर्व प्रथम महिलांच्या हस्ते पुजन होईल
⭕सकाळी ठिक 8.45 वा शोभायात्रा व पालखी सोहळ्याला सुरुवात होईल⭕शोभायात्रा व पालखी सोहळा मार्ग पुढील प्रमाणे असेल- गणपती मंदिर(सागर बिल्डिंग)- ज्ञानेश्वर नगर (स्टेट बँक पासुन) भुयारी मार्ग- मेनरोड बाजारपेठ- मारुती मंदिर(इंदिरा नगर) – बाजारपेठ- हनुमान रोड- काळा मारुती चौक- सुतार नेट – गणपती मंदिर बाजारतळ मार्गे काळा मारुती मंदिर
⭕काळा मारुती मंदिर येथे ठिक दुपारी 12.00 वा श्रीरामाची महाआरती व हनुमान चालिसा होईल नंतर प्रसाद वाटपमिरवणुकीमध्ये सर्वात पुढे बँजो असेल त्या पाठीमागे श्रीरामाच्या प्रतिमेचा डिजिटल बोर्ड असेल. त्यानंतर हलगी पथक असेल नंतर टाळकरी मंडळी असतील त्यानंतर पालखी असेल पालखी पाठीमागे ट्रैक्टर मध्ये श्रीरामाची प्रतिमा व श्री राम लक्ष्मण सिता यांचे वेशभूषा धारण करुन लहान मुले-मुली असतील.