जेऊरच्या भारत हायस्कूलचा दहावीचा ९५.८७% निकाल
जेऊर, दि. २८ (करमाळा-LIVE)-
महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून जेऊरच्या भारत हायस्कूलचा ९५.८७ टक्के निकाल लागला आहे.
एकूण ३२५ विद्यार्थी या परिक्षेला बसलेले होते, पैकी ३०२ विद्यार्थी पास झालेले असून हायस्कूल चा ९५.८७% निकाल लागला आहे.
साक्षी रामहरी शिरस्कर ९७.४०% घेऊन प्रथम आली असून, वैष्णवी पोपट सरडे ९५.८०% घेऊन द्वितीय तर गायत्री उदय दुनाखे ९५.२०% घेऊन तृतीय आली आहे.
डिस्टींशन मध्ये १०८, A ग्रेड मध्ये १०३, B ग्रेड मध्ये ७० तर पास ग्रेड मध्ये २१ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांनाचे संस्था अध्यक्ष माजी आमदार नारायण आबा पाटील, उपाध्यक्ष अनिल गादिया, सचिव प्रा. अर्जून सरक, प्राचार्य केशव दहिभाते, उपप्राचार्य एन.डी कांबळे, पर्यवेक्षक बाळासाहेब शिंदे यांनी अभिनंदन केले.