जेऊरचा सुहास गायकवाड झी-मराठी वरील ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत ; मालिकेचा एपिसोड २४ जुलैला पहायला मिळणार


जेऊर, दि. २२ (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथील सुहास गायकवाड झी-मराठी वाहिनी वर सुरू असलेल्या मालिकेत पहायला मिळाणार आहे.
‘लाखात एक आमचा दादा ‘ या झी-मराठी वाहिनी वरील मालिकेत सुहास दिसणार असून, या मालिकेचा एपिसोड उद्या गुरूवारी २४ जुलैला पहायला मिळणार आहे. सुहास या मालिकेत ‘सुरेश’ (नवरा) या पात्रात दिसणार आहे. ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी ६.३० वाजता प्रसारीत होत आहे.
सुहासने या अगोदरही बराच मालिका, लघूपट, मराठी चित्रपटात भूमिका केलेल्या आहेत. सुहासचे कौतुक सध्या जेऊर परिसरात होत आहे.
“लाखात एक आमचा दादा” मालिकेतील एक सीन








