उद्या जेऊर येथे स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळ संचलित दुर्गादेवी माता मंदिराची प्राणप्रती स्थापना होणार ; महाप्रसादाचे आयोजन
जेऊर, दि. 9 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथे स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळ संचलित दुर्गादेवी माता मंदिराचे कलशरोहन व मुर्ती ची प्राणप्रती स्थापना उद्या रविवारी 10 सप्टेंबरला होणार आहे.
स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या शेजारी हा कार्यक्रम होणार असून या हा सोहळा केम येथील हभप जयंत गिरी महाराज यांच्या हस्ते सकाळी 11.00 वाजता होणार असून या कार्यक्रमाला माजी आमदार नारायण आबा पाटील उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
1) सकाळी 7 ते 11 स्थापीत देवता पुजन व हवन
2) सकाळी 11 ते 12 मुर्ती स्थापना व कलश रोहन
3) दुपारी 12 ते 2.00 हवन, पुर्णाहुती, महानैवद्य व आरती.
4) दुपारी 12 ते 3.00 महाप्रसाद
या कार्यक्रमाला जास्तीतजास्त भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळ, स्वामी विवेकानंद वाचनालय, स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.