जेऊर : एलआयसी (LIC) च्या वतीने शिक्षक दिन साजरा



जेऊर, दि. 6 (करमाळा-LIVE)-
शिक्षक हा समाजाचा परिवर्तन करण्यासाठी माध्यम नसून एक आपल्याला मिळालेली अनमोल देणगी आहे शिक्षकांमुळे आपल्याला ज्ञान अवगत मिळते तर शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करत आहेत असे मत एलआयसी चे विमा सल्लागार धनंजय वळेकर यांनी व्यक्त केले.
शिक्षक दिनानिमित्त करमाळा तालुक्यातील जेऊर परिसरातील 201 शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा 23 वर्षांपासून एलआयसी (LIC) चे काम करणारे प्रसिद्ध विमा सल्लागार आणि विमा प्रतिनिधी नेमणूक प्रशिक्षण अधिकारी धनंजय वळेकर यांनी सत्कार केला.
यावेळी 201 शिक्षकांचा फेटा बांधून श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन सन्मान केला.
जेऊर येथील भारत हायस्कूल, भारत प्रायमरी, ज्युनियर कॉलेज, भारत महाविद्यालय, निभोरे येथील छत्रपती संभाजी विद्यालय, जि.प.प्राथ.शाळा निंभोरे, शेटफळ, केडगाव, चिकलठाण येथील शाळांना भेटी देऊन शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी युवा नेते पृवीराज पाटील उपस्थित होते.
- भारत प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील व भेटकार्ड
- सोलापूर सामाजिक वनीकरण विभागाकडुन आयोजित स्पर्धेत जेऊरच्या भारत हायस्कूलची आरूषी बादल प्रथम तर शिवानी कुंभार तृतीय
- स्वतःचा कारखाना विकणाऱ्या माजी आमदार शिंदे आणि त्यांच्या गटाने आदिनाथची काळजी करू नये- पाटील गट
- जेऊर येथील ओंकार पोळ याचे प्रथम पुण्यस्मरण ; केम व शेटफळ येथे विद्यार्थ्यांना भोजन व शालेय साहित्यांचे वाटप
- कोर्टीच्या सरपंच भाग्यश्री नाळे-मेहेर यांना ग्रामररत्न सरपंच पुरस्कार जाहीर


