08/06/2025

नॕशनल अबॕकस स्पर्धेत सात जिल्ह्यातून प्रथम आलेल्या ईश्वरी काशिद चा जेऊर ग्रामपंचायत आणि नाभिक संघटनेच्या वतीने सन्मान

0
IMG-20230105-WA0031.jpg

जेऊर, दि. 5 (करमाळा-LIVE)-
नॕशनल अबॕकस स्पर्धेत सात जिल्ह्यातून प्रथम आलेल्या ईश्वरी काशिद चा जेऊर ग्रामपंचायत व नाभिक संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

पुणे येथे झाले नॅशनल अबॅकस स्पर्धेत 8750 विद्यार्थ्यांमधून ईश्वरी सोमनाथ काशिद (इयत्ता तिसरी) हीचा लेवल 1 च्या परिक्षेत प्रथम क्रमांक आला असून तिचा पुढील होणाऱ्या इंटरनॅशनल लेवल परिक्षे साठी निवड झाल्याबद्दल माजी आमदार नारायण आबा पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती अतुल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी नायब तहसीलदार लोंढे साहेब, जेऊर ग्रामपंचायत सदस्य मुबारक शेख, राजू शेठ तांबोळी, कोंढेजचे सरपंच गणेश सव्वाशे, भिवरवाडीचे बागायतदार दत्तात्रय आरकिले, सूर्यकांत पाटील, जेऊर नाभिक संघटना अध्यक्ष- सुहास सुर्यवंशी, मनोज गोरे, गोविंद जाधव, संतोष माने, दिलीप माने, कुलदीप जाधव, नाना जाधव, मनोजकुमार माने, संदिप माने, रमेश माने, दिपक खत्री, माजी सरपंच भास्कर कांडेकर, विनोद गरड, प्रविण काळे, शिवराज काशिद, रामेश्वर सुर्यवंशी, ज्ञानेश्वर शिंदे तसेच जेऊर नाभिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थितीत होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page