17/12/2024

जेऊर मधील जनतेला विकास आणि विश्वासार्हता याची पारख असल्यामुळे या निवडणुकीत सुध्दा त्यांचा आशीर्वाद मिळेल- माजी आमदार नारायण आबा पाटील

0
IMG-20231027-WA0025.jpg

जेऊर, दि. 27 (करमाळा-LIVE)-
विकास आणि विश्वास ह्या दोन्हीचे महत्त्व जेऊर मधील सुजाण नागरिक जाणून असल्यानेच चांगल्या उमेदवारांची पारख करण्यात ते कधी चुकत नाहीत, या निवडणुकीत सुद्धा मतदारांचा आशीर्वाद आपल्या पॅनलला मिळणार असल्याची खात्री माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी बोलून दाखवली.

श्री खंडेश्वर ग्रामविकास पॅनलच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. जेऊर येथील ग्रापंचायत निवडणुकीत माजी आमदार नारायण पाटील प्रणित श्री खंडेश्वर ग्रामविकास पॅनलने आपल्या प्रचाराचा नारळ आज फोडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी घाडगे भाऊसाहेब होते. तर यावेळी व्यासपीठावर आनंद नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुभाष सुराणा, सभापती डबल उपमहाराष्ट्र केसरी अतूल पाटील, राजू अण्णा पाटील, सोसायटी चेअरमन राजाभाऊ जगताप, व्हॉईस चेअरमन महेश कांडेकर, माजी सरपंच सुलेमान मुल्ला, माजी सरपंच भास्कर कांडेकर, माजी सरपंच राजूशेठ गादिया, माजी सरपंच भारत साळवे, माजी उपसरपंच अंगद गोडसे, माजी सदस्य आप्पा मंजुळे, मुबारक शेख, विनोद गरड, संजयकुमार दोशी, बापूसाहेब घाडगे, परमेश्वर पाटील, संतोष वाघमोडे, राजाभाऊ तांबोळी, प्रकाश निमगिरे, शेरखान नदाफ, सुनील कांबळे, हंबीराव चव्हाण, राजू लोंढे, पोपट माने, हनुमंत विटकर, रामदास कोठावळे, रामलाल कोठारी, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अर्जुन सरक सर, भारत महाविद्यालय प्राचार्य डॉ अनंत शिंगाडे, प्राचार्य दहिभाते सर, राजूशेठ राठोड, किशोर शेठ राठोड, सागर बादल, नितीन मंडलेचा, जालिंदर साळी, दत्ता तळेकर, हनुमंत कांडेकर, विष्णू माने, रसिक करे, सोमनाथ गवेकर, दादा मोहिते, राजाभाऊ जाधव, रामभाऊ जगताप, हिंदुराज निर्मळ, राहुल रासकर, राजाभाऊ गरड, अजीज पठाण, धनंजय घोरपडे, अनिल माने, दिलीप माने, किसन माने, सुहास सुर्यवंशी, राजू माहुले, संजय गुरव, बाळू हेळकर, गुलाब शेख, अच्युत निमागिरे, कांतीलाल लूनावत, आनंद म्हमाने, दिगंबर निर्मळ, पप्पू आतकर, ब्रम्हदेव जाधव, सुनील बादल, रमेश भोसले, अवसरे दादा, शिवाजी कांडेकर, नुस्ते भाऊ, अरूणकाका गावडे, सागर पांढरे, सत्यम सुर्यवंशी, आरिफ शेख, उमेश माने, शिवाजी कसबे, दौलत निमगीरे, शफीक पठाण, घोरपडे सर, शाम पवार, रवींद्र मोरे आदी सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते ग्रामदैवत श्री खंडेश्वरास नारळ वाढवून प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला.

प्रभाग-1 चे उमेदवार
नागेश झांझुर्णे
धनंजय शिरस्कार
उषा गरड

प्रभाग-2 चे उमेदवार
शिवंजली कर्णवर
शुभम कोठावळे
सागर भगत

प्रभाग-3 चे उमेदवार
मालन निमगिरे
शबाना पठाण
उमेश मोहिते

प्रभाग-4 चे उमेदवार
ओंकार कांडेकर
उषा निर्मळ
अलका किरवे

प्रभाग-5 चे उमेदवार
समीरा दोशी
संदीप कोठारी
रोहिणी सुतार

यांनी मतदारांना अभिवादन करून मतदानाचे आव्हान केले. प्रास्तविक सोसायटी चेअरमन राजाभाऊ जगताप यांनी केले तर सूत्रसंचालन माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद गरड यांनी केले. उपस्थितांचे आभार भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य विलास पाथ्रुडकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page