जेऊरच्या उपसरपंचपदी पाटील गटाचे नागेश झांजुर्णे यांची निवड
जेऊर, दि. 24 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी नागेश झांजुर्णे यांची बिनविरोध निवड झाली. आहे.
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जेऊर ग्रामपंचायतवर पाटील गटाची एक सत्ता आली आहे. सरपंचपदासह पाटील गटाने सर्वच्या सर्व 15 जागा जिंकल्या होत्या. जनतेतून सरपंचपदी पृथ्वीराज पाटील हे निवडून आले होते.
आज जेऊर येथे उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली पाटील गटाचे सर्वेसर्वा आणि माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक-1 चे सदस्य नागेश झांजुर्णे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
नागेश झांजुर्णे हे दोन वेळा जेऊर ग्रामपंचायत निवडणूकीत निवडून आलेले असून,स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे चेअरमन देखील आहेत. युवा वर्गात तसेच जेऊर बाजारपेठेत त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत.
त्यांच्या निवडी बद्दल माजी आमदार नारायण आबा पाटील, माजी सभापती अतुल पाटील, भारत शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. अर्जून सरक, पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर, माजी सरपंच भास्कर कांडेकर, राजूशेठ गादिया यांनी अभिनंदन केले आहे.
- रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरीच्या जाचक अटी शिथिल करा- भाजप जिल्हा सचिव लक्ष्मण केकान
- करमाळ्यात मराठा कुणबी प्रकरणासाठी अडवणूक ; ऐजंट आणि अधिकाऱ्यांमध्ये मिलीभगत- युवासेनेचा धरणे आंदोलनाचा इशारा
- भाळवणीच्या तृप्ती वाघमारे चे नीट (NEET) परीक्षेत घवघवीत यश
- कुंभेजच्या बागल विद्यालयात केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धांचे आयोजन
- २०१४ ला २५७ चा मटका नव्हता, जनतेचा कौल होता! हे २०२४ लाही जनतेने दाखवून दिले ; विरोधकांना पाटील गटाचा “हाबाडा”