एमएसईब (MSEB) च्या बार्शी विभागामध्ये उत्कृष्ट कामगारी केल्याबद्दल वांगी आणि जेऊर उपविभागचा सन्मान
करमाळा, दि. 10 (करमाळा-LIVE)-
एमएसईबच्या (MSEB) बार्शी विभागामध्ये उत्कृष्ट वसुली केल्या बद्दल वांगी शाखेचा द्वितीय क्रमांक तर रोहित्र नादुरुस्त कमी करण्यात जेऊर उपविभागचा सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला आहे.
आज सोलापूर जिल्हा नियोजन भवन या ठिकाणी उत्कृष्ट काम केलेल्या अभियंताचा गुणगौरव अधीक्षक अभियंता सांगळे, कार्यकारी अभियंता कुऱ्हाडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जेऊर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता अतुल गलांडे, वांगी शाखेचे सहायक अभियंता अशोक काळे, जेऊर शाखेचे अभियंता अमोल चंदनशिव, साडे शाखेचे नागेश साळुंखे यांच्या गुणगौरव करण्यात आला.
वांगी शाखेची वसुली करण्यासाठी भुजंगराव सुळ, औदुंबर कोल्हे, नंदकुमार उघडे, जावेद पठाण, दादा कांबळे, सुभाष राऊत, समाधान पाटील, ऋषिकेश इंगोले, उमेश जावळे, सुरज मुंडे यांनी परिश्रम घेतले.