जेऊर येथे जिजाऊ ब्रिगेड व लोकस्वराज प्रतिष्ठानच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा
जेऊर, दि. 22 (करमाळा-LIVE)-
जेऊर येथे जिजाऊ ब्रिगेड व लोकस्वराज प्रतिष्ठानच्यावतीने महिला दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.
महिलांच्या कला गुणांना व बौद्धिक क्षमतेला वाव देण्यासाठी जिजाऊ ब्रिगेड व लोकस्वराज प्रतिष्ठान ने आयोजित केलेला उपक्रम अतिषय स्तुत्य व अनुकरणीय असल्याचे यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील यांनी सांगितले. पुढे श्री करे-पाटील म्हणाले की, या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेतलेल्या वक्तृत्व, वेशभूषा व होम मिनिस्टर स्पर्धामध्ये सामान्य महिलांना त्यामध्ये सहभागी होण्याची संधी देणाऱ्या आहेत. यावेळी स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या महिलांना विविध बक्षिसांचे वितरण गणेश करे-पाटील, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा सुरजा बोबडे, जलसंपदा विभागाच्या अधिकारी माधुरी पवार या मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. होमिनिस्टर स्पर्धेत पहिले बक्षीस सुवर्णा मोहिते, दुसरे बक्षीस आरती घाडगे, तिसरे बक्षीस प्रियंका देवकते, उत्तेजनार्थ स्वाती सुरवसे यांना मिळाले. वक्तृत्व स्पर्धा पहिले बक्षीस अपर्णा पाथ्रुडकर, दुसरे बक्षीस उज्वला मेहता, तिसरे बक्षीस अंकिता वेदपाठक तर वेशभूषा स्पर्धेत पहिले बक्षीस स्वाती सुरवसे, दुसरे बक्षीस संध्या हेळकर व तिसरे बक्षीस अपर्णा पाथरूडकर यांना मिळाले.
याप्रसंगी मान्यवरास संत तुकाराम महाराजांच्या गाथा देव सन्मान करण्यात आला. प्रत्येक उपस्थित महिलेस राजमाता जिजाऊ अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले अशा थोर मातांची पुस्तके भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॕड सविता शिंदे यांनी केले. आभार विजया कर्णवर यांना मानले. कार्यक्रमाचे वेळी बालसंगोपन योजनेचा लाभ मिळण्यासाठी 12 फॉर्म भरून घेण्यात आले. पंचायत समितीचे श्री. मस्तुद यांनी रोजगार निर्मिती बद्दल माहिती दिली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिजाऊ ब्रिगेड व लोकस्वराज प्रतिष्ठाण महिलांनी परिश्रम घेतले.