07/06/2025

जेऊरच्या विवान गरड ची राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड

0
IMG_20241109_140527.jpg

जेऊर, दि. ९ (करमाळा-LIVE)-
चाळीसगावं (जि.जळगावं) येथे झालेल्या राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेतून जेऊर येथील भारत हायस्कूल व नूतन करमाळा तालुका हँडबॉल असोसिएशनचा विद्यार्थी आणि ग्रामपंचायत सदस्य विनोद गरड यांचे चिरंजीव विवान गरड याची छत्तीसगढ येथे होणाऱ्या १४ वर्ष मुले राष्ट्रीय हॅन्डबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

निवड झाल्याबद्दल संस्था अध्यक्ष माजी आमदार नारायण आबा पाटील, उपाध्यक्ष अनिलकुमार गादिया, सचिव प्रा.अर्जनराव सरक, माजी सभापती अतुल पाटील, माजी सभापती शेखर गाडे, सरपंच पृथ्वीराज पाटील तसेच नूतन करमाळा तालुका हँडबॉल असोसिएशन जेऊर चे अध्यक्ष संतोष नुस्ते, सर्व संस्था पदाधिकारी आणि प्रशालेचे प्राचार्य ए.जी.सरोदे, उपप्राचार्य एन.डी कांबळे, पर्यवेक्षक बी.एस शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.

विवानला क्रीडा शिक्षक पाटील सर,सरक सर आणि वाघमोडे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page