‘सर आली धावून, बोगदा चालला वाहून! जिंती-कावळवाडी रस्त्यावरील रेल्वेच्या भुयारी मार्गाला लागली उतरती कळा ; दोन्ही बाजूने बोगदा लागला ढासळायला

करमाळा, दि. २० (करमाळा-LIVE)-
जिंती- कावळवाडी रस्त्यावर असलेल्या रेल्वेचा भुयारी मार्ग मृत्यूचा सापळा बनलेला असून, रेल्वे बोगद्याच्या कठाड्याची उंची जास्त असल्यामुळे अन् सिमेंट काँक्रिट नसल्यामुळे मोठ-मोठे दगड माती रस्त्यावर पडत आहेत.
जिंती ते कावळवाडी रोडवर रेल्वेचा भुयारी मार्ग आहे. भुयारी मार्ग झाल्यापासून तिथे अडचणी निर्माण होत आहेत. या भुयारी मार्गातून वर्दळ जास्त आहे, या मार्गातून जात असताना दोन्ही बाजूने बोगदा ढासळत आहे, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
भुयारी मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे, तरी त्वरित दोन्हीही बाजूने सिमेंट काँक्रिट करून संरक्षण भिंत बांधावी अशी मागणी ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख भिवाजी शेजाळ, मकाईचे संचालक रामभाऊ हाके, कावळवाडी चे सरपंच तुषार हाके यांनी केली आहे.