जेऊर येथील डॉ सुभाष सुराणा यांना मातृशोक ; कमलाबाई सुराणा यांचे निधन
जेऊर, दि. 14 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथील सामाजिक कार्यकर्ते, आनंद पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन डॉ सुभाष सुराणा यांना मातृशोक झाले आहे.
डॉ सुराणा यांच्या मातोश्री कमलाबाई हिरालाल सुराणा (वय 89) यांचे आज सकाळी 7.30 मिनिटांनी वृध्दपकाळाने निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात एक मुलगी सुमन पारख, तीन मुले डॉ सुभाष सुराणा, राजेंद्र सुराणा, सतिश सुराणा, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.