कंदर येथील श्री बबनरावजी शिंदे स्कूल मध्ये महिला दिन उत्साहात साजरा
कंदर, दि. 8 (करमाळा-LIVE)-
कंदर येथील श्री.बबनरावजी शिंदे स्कूल मध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
यावेळी महिला दिनाच्या निमित्ताने स्कूल मध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणे केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिव राजकुमार राऊत होते. तसेच स्कूलचे मुख्याध्यापक जाकीर मुलाणी यांनी मनोगतात महिला दिनाचे महत्त्व विषद केले. यानंतर मनिषा नलवडे यांनी महिला दिनानिमित्त विचार व्यक्त केले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन पुनम बसळे यांनी केले. प्रास्ताविक विद्या शिंदे यांनी केले. तर आभार क्षितीजा दोशी यांनी मानले.