कंदर येथील श्री बबनरावजी शिंदे स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
कंदर, दि. ९ (करमाळा-LIVE)-
कंदर येथील श्री बबनरावजी शिंदे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.
यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये स्कूलमधील जूनियर, सीनियर ते इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची भारतीय संस्कृती दर्शन या संकल्पने अंतर्गत भारतातील विविध राज्यांची संस्कृती दर्शवणारी लोकगीते व नृत्य सादर करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब काका राऊत, सचिव राजकुमार राऊत, मुख्याध्यापक जाकीर मुलाणी, पत्रकार सुहास आबा साळुंखे, काकासाहेब निंबाळकर, संदिप साळुंखे, अण्णासाहेब भांगे, शिवसेना तालुका उपप्रमुख मनोज रोकडे, सहकार्य कलेक्शनचे बालाजी पाटील, सचिन तळे, सुशांत शिंदे, पत्रकार सुनील शिंदे, रिकेश नलवडे आदी पालक वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडूरंग भगत व अमृता घनवट यांनी केले तर प्रास्ताविक मुख्याध्यापक जाकीर मुलाणी यांनी केले.