कंदर येथे श्री बबनरावजी शिंदे स्कूलमध्ये हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न
जेऊर, दि. 19 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील कंदर येथील बबनरावजी शिंदे स्कूल मध्ये महिला पालकांचा हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला.
मकर संक्रांतीच्या निमित्ताने कंदर येथील श्री बबनरावजी शिंदे स्कूल मध्ये महिला पालकांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम बुधवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व महिला पालकांना स्कूलच्या वतीने मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन तिळगुळ वाटप करण्यात आले. स्कूलच्या वतीने बकेट बॉल, सर्कल मध्ये बॉल टाकणे, स्ट्रॉ गेम, पताके चिटकवणे या स्पर्धा महिला पालकांमध्ये घेण्यात आल्या होत्या. उपस्थित महिला पालकांनी मोठ्या प्रमाणात स्पर्धेत सहभाग नोंदवला.
या स्पर्धेत मोहिनी शिंदे बकेट बॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक, मनीषा जगदाळे सर्कल बॉल टाकणे प्रथम क्रमांक, यमुना जगदाळे स्ट्रॉ गेम प्रथम क्रमांक, मनीषा जगदाळे पताके चिटकवणे प्रथम क्रमांक स्पर्धेत विजेती ठरलेल्या महिला पालकांना सावित्रीबाई राऊत, तृप्ती राऊत, भारती राऊत यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी सूत्रसंचालन पुनम बसळे, मनोगत मनीषा नलवडे, प्रास्ताविक विद्या शिंदे तर आभार क्षितिजा जोशी यांनी मानले. संस्थेचे सचिव राजकुमार राऊत मुख्याध्यापक जाकीर मुलाणी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी महिला पालक विजेती स्पर्धकांचे अभिनंदन केले.