08/06/2025

कंदर: बबनरावजी शिंदे स्कूलमध्ये आनंदी बाजार संपन्न

0
IMG-20230129-WA0048.jpg

कंदर, दि. 30 (करमाळा-LIVE)-
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व विद्यार्थ्यांना व्यवहारीक ज्ञान समजण्यासाठी कंदर येथील बबनरावजी शिंदे स्कूलमध्ये आनंदी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते.

सदरील कार्यक्रमाचे उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पुजनाने झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सहकार्य उद्योग समूहाचे बालाजी पाटील व प्रमुख पाहुणे गणेश जगताप, काका शिंदे, संभाजी लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी भाजीपाला, विविध प्रकारचे माळवे, फळे, स्टेशनरी, किराणा, वडापाव, पाणीपुरी भेळ, इडली, आईस्क्रीम आदी विकण्यासाठी ठेवले होते.

पालकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. आनंदी बाजारातून एकूण उलाढाल 35 हजार 234 झाली. यावेळी कविटगावंचे उपसरपंच भाऊसाहेब जगदाळे, रिकेश नलवडे, हनुमंत शिंदे, प्रविण बसळे, सचिन तळे, सुहास नवले, पत्रकार गणेश जगताप, न्यायालयीन क्लार्क सचिन जाधव, पोलीस पाटील धन्यकुमार सुरवसे, महादेव बसळे, कुलदीप पाटील आदि पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे सचिव राजकुमार राऊत, मुख्याध्यापक जाकिर मुलाणी, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. निवेदन गणेश जगताप यांनी केले. सूत्रसंचालन सुशांत शिंदे तर प्रस्ताविक सुरज पवार यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page