कंदर येथील बबनरावजी शिंदे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
करमाळा, दि. 24 (करमाळा-LIVE)-
कंदर येथील बबनरावजी शिंदे इंग्लिश मिडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पुजनाने व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्ती पुजनाने यशकल्याणी संस्थेचे प्रा. गणेश करे-पाटील, कृषीभूषण दादासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास करणारे व्यासपीठ दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात बबनरावजी शिंदे स्कूलमध्ये साजरा करण्यात येते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास व्हावा हा उद्देश या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून साध्य केला जातो. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब राऊत, संस्थेचे सचिव राजकुमार राऊत, मुख्याध्यापक जाकीर मुलाणी यांच्या हस्ते करण्यात आला. प्रा. गणेश करे-पाटील, गुटाळ मॉडर्न प्रशालेचे अध्यक्ष संदिपान गुटाळ, बिपिन शेठ सोनी, संदीप उपाध्ये, कृषीभूषण दादासाहेब पाटील, कविटगावचे उपसरपंच भाऊसाहेब जगदाळे, बबनरावजी शिंदे इंग्लिश मिडियम स्कूलचे अध्यक्ष बाळासाहेब राऊत, माजी कृषी अधिकारी औदुंबर लोकरे, सहकार्य कलेक्शनचे बालाजी पाटील, कै. पांडुरंग भाऊ उपाळे माध्यमिक विद्यालय आहेरगावं चे अध्यक्ष संतोष उपाळे, संस्थेचे सहसचिव दादासाहेब राऊत, विजय नवले, प्रगतशील बागायतदार विलास माने, पत्रकार सुनील शिंदे, देविदास घोडके, श्री कॉम्प्युटर जेऊरचे प्रदीप पवार, डॉक्टर ब्रिजेश बारकुंड, कंदरचे उपसरपंच मौलासाहेब मुलाणी, संस्थेचे सचिव राजकुमार राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
गणपती गीताने स्नेहसंमेलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी टुकुर टुकुर, केळेवाली, कोको कोला, गलती से मिस्टेक, पंजाबी, कोळीगीत, आज की पार्टी, तानाजी थीम, इंग्लिश सॉंग, मल्हार, हॉरर थीम, एका सक्का, मोबाईल सॉंग, मूक नाटक, चंद्रा लावणी, ढोलिदा गरबा, देशभक्ती थीम गीते सादर करण्यात आली. ज्युनिअर, सिनियर ते पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी स्नेहसंमेलनाच्या गाण्यांमध्ये सहभागी होते. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. उपस्थित मान्यवर पालक व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले. स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन पांडुरंग भगत यांनी केले. यावेळी सुरज पवार, सुशांत शिंदे, तृप्ती राऊत, विद्या शिंदे, मनिषा नलवडे, पूनम भोसले, क्षितिजा जोशी व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.