कंदर येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी
कंदर, दि. 13 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील येथील श्री. शंकरराव भांगे मालक प्राथमिक विद्यामंदिर शाळेत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.
प्रथमतः प्रतिमेचे पूजन डिजिटल संदेशचे पत्रकार संदीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्था सचिव प्रा. सुनील भांगे, कण्वमुणी विद्यालयाचे मुख्याध्यापक बापू पवार, राजू जहागिरदार, मुख्याध्यापिका रेश्मा उबाळे यांच्या सह सहशिक्षिका ज्योती कांबळे, रेखा राखुंडे, सुवर्णा गायकवाड, स्वाती पवार, मोहिनी नवले, पूजा देवकर, अफरोज सय्यद, सुनिता लांडगे व मदतनीस उषा सुतार उपस्थित होते.
यावेळी श्रावणी दादासाहेब पांडव, नयन गणेश भोजने, किर्ती सुनील कदम, प्रियंका अनिल सुरवसे, प्राची, अर्जुन मांडवे, श्रेया सोमनाथ इंगळे, साईराजे राजकुमार माने, रोशन, इक्रमदिन हवलदार, संचिता अनिल यादव, प्रणव अनिल सुरवसे, निशा दत्तात्रय केदार, साई दुर्वास सुरवसे, ईश्वरी संजय पवार यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचे विषयी भाषणे केली.
प्राध्यापक सुनील भांगे बोलताना म्हणाले की, थोर महापुरुषांचे विचार आजच्या काळात तरुणांनी आत्मसात करणे काळाची गरज बनली आहे.. हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान चातुर्य चरित्र पराक्रम व संघटन अशा सत्वगुणांचे बाळकडू राजमाता जिजाऊ यांनी पाजले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहशिक्षिका रेखा राखुंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापका रेश्मा उबाळे यांनी मानले