कंदरच्या तुषार शिंदेची इंडियन फॉरेस्ट आॕफिसर पदी निवड झाल्याबद्दल सन्मान


करमाळा, दि. 6 (करमाळा-LIVE)-
कंदर येथील तुषार श्रीहरी शिंदे यांची इंडियन फॉरेस्ट ऑफिसर (Class 1) म्हणून देशात 36 व्या रँकला निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
यावेळी करमाळा नगरपालिकेचे माजी नगरसेवक राहुल जगताप यांनी सांगितले की, मनात जिद्द, ध्येय असेल तर प्रतिकूल परिस्थिती जरी असली तरी त्यावर मात करता येते, तुषार याने जिद्द आणि कष्टाच्या जोरावर हे यश मिळविलेले असून याचा आदर्श तरूणांनी घ्यावा असे मत व्यक्त केले.
यावेळी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रंगनाथ शिंदे, विजुदादा नवले, राहुल वीर, दिग्विजय मोरे, प्रतिक जगताप, सागर नागटिळक, बाळासाहेब राउत व कंदर मधील ग्रामस्थ उपस्थित होते.
