कंदर येथे आनंद बाजार उत्साहात साजरा
कंदर, दि. 16 (करमाळा-LIVE)-
कंदर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री. शंकरराव भांगे मालक प्राथमिक विद्यामंदिर व कन्वमुनी विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आनंद बाजार या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग छोट्या आठवडे बाजारचा अनुभव घेतला.
यावेळी विद्यार्थी विक्रेते तर पालक शिक्षक व अन्य विद्यार्थी ग्राहक बनल्याचे सुखद चित्र पाहायला मिळाले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध वस्तू तसेच भाजीपाला फळ विक्रीतून मोठी आर्थिक उलाढाल झाली. या आनंदी बाजारचे उद्घाटन आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तथा संस्थेचे संचालक नवनाथ भांगे, सरपंच मौला साहेब मुलाणी, पैलवान उमेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रशालेतील विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान तसेच गणितीय संकल्पना या मधून लक्षात याव्यात असा एक अनोखा अनुभव देण्याचा प्रयत्न या उपक्रमांतून करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची छोटी दुकाने प्रशालेच्या प्रांगणात थाटली होती. विविध वस्तू घेण्यासाठी पालकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या आयोजित केलेल्या आनंदी बाजारामध्ये एकूण 75000 रुपयांची आर्थिक उलाढाल झाली असल्याची माहिती संस्थेचे सचिव प्राध्यापक सुनील भांगे यांनी दिली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका एस. एन .कदम व आर. डी .उबाळे तसेच इतर शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले..