लोकनेते स्व दिगंबरराव मामा बागल कृषी महोत्सव : प्रचार व प्रसार वाहनाचे पुजन- 9 ते 13 मार्च होणार भव्य कृषी महोत्सव


करमाळा, दि. 5 (करमाळा-LIVE)-
राज्याचे माजी मंत्री लोकनेते स्व दिगंबरराव मामा बागल यांच्या 68 व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित 9 मार्च ते 13 मार्चया कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या प्रचार आणि प्रसार करणाऱ्या वाहनाची विधिवत पूजा करमाळा नगरपालिकेचे नगरसेवक डॉ. अविनाश घोलप यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या गाडीला स्वर्गीय मामांचे जुने अनुभवी कार्यकर्ते रामदासजी बाबर व लक्ष्मण नरसाळे यांनी हिरवा झेंडा दाखवून याचा प्रारंभ केला.
यावेळी मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व कृषी महोत्सवाचे स्वागताध्यक्ष दिग्विजय बागल, राज्य सहकारी साखर संघाच्या संचालिका आणि कृषी महोत्सवाच्या मुख्य निमंत्रक रश्मीदीदी बागल, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे, मार्केट कमिटीचे सभापती प्राध्यापक शिवाजीराव बंडगर, उपसभापती चिंतामणी दादा जगताप, आदिनाथ कारखाना चेअरमन धनंजय डोंगरे, नगरसेवक शौकत नालबंद, सचिन घोलप, राजश्रीताई माने , प्राचार्य मिलिंद फंड, कल्याणराव सरडे, माजी नगरसेवक सुनील बनसोडे, नरारे सर, विजय पवार, श्रीदेवीचामाळ चे माजी सरपंच राजेंद्र फलफले, भाऊसाहेब फुलारी, पत्रकार संघाचे अध्यक्ष व शिवसेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख महेश चिवटे, लोकमतचे पत्रकार नासिर कबीर, जयंत दळवी, एल. टी.राख, माजी संचालक दिनेश भांडवलकर, शंभूराजे फरतडे, विजय लावंड, महेश तळेकर, संजय दिवाण, कुमार माने, विजय घोलप, सचिन पिसाळ, बाळू नाना रोडे, बिभिषण खरात, वांगी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन डॉ विजय रोकडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
