कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प विजयदादांमुळेच ; याचा फायदा करमाळा तालुक्याला होणार- प्रा. शिवाजीराव बंडगर
करमाळा, दि. 11 (करमाळा-LIVE)-
कृष्णा खोर्यातील पाणी उजनी व कोळगाव धरणात येण्याचा सर्वाधिक लाभ करमाळ्याचाच असल्याचे मत धरग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव बंडगर यांनी व्यक्त केले यावेळी प्रकल्पाचे जनक माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा शिवरत्न वर करमाळकरांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेस काल राज्य सरकार ने 3326 कोटी रुपये मंजूर केले आहे. त्यामुळे सहा जिल्हे आणि बत्तीस तालुक्यातील साडेपाच लाख हेक्टर शेतीला पाणी मिळणार आहे. याचा लाभ पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील दुष्काळी भागाला होणार आहे. विशेषता हे पाणी कृष्णा खोर्यातून उजनी धरणात येवून पुढे सिना, कोळगाव धरण मार्गाने मराठवाड्यात जाणार असल्याने करमाळा तालुक्याला याचा सर्वाधिक लाभ होणार असल्याने धरणासाठी सर्वस्व त्यागणार्या उजनी व कोळगाव धरणग्रस्तासह संपूर्ण करमाळा तालुक्यालाच आनंद झाला असल्याचे प्रतिपादन उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा.शिवाजी बंडगर यांनी काल अकलूज येथे शिवरत्न बंगल्यावर बोलताना केले.
कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेस सरकारने काल निधी मंजूर केल्यानंतर या योजनेचे जनक माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा सन्मान करमाळा तालुक्याच्या वतीने शिवरत्न बंगला, अकलूज येथे करण्यात आला. यावेळी प्रा बंडगर बोलत होते. या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्या सविताराजे भोसले, सदस्य दिलीप तळेकर, आदिनाथ चे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, उदयसिंह मोरे-पाटील, माजी संचालक संतोष खाटमोडे पाटील, वांगीचे माजी सरपंच विठ्ठल शेळके, माणिकराव साखरे, शिवशंकर माने, महेंद्र पाटील, सरडे बापू, औदुंबर भोसले, अमरजीत साळुंके, महारूद्र पाटील, हनुमंत पाटील, आबा टापरे, चैतन्य पाठक, गणेश घोरपडे, बाळासाहेब महानवर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना बंडगर म्हणाले की, या योजनेस काहींनी विरोध करत खिल्ली उडवली होती. परंतु विजयदादा यांनी आपली राजकीय ताकद पणाला लावली. सतत याचा पाठपुरावा चालूच ठेवला. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना लोकांच्या सहीचे निवेदन त्याना दिले. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांनीही या योजनेचा ध्यास घेतला होता. या सर्वांच्या प्रयत्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. अपुऱ्या पावसामुळे उजनी तसेच कोळगाव धरण अनेकदा भरली जात नाहीत. त्यावेळी शेकडो एकर शेती धोक्यात येते. वीज कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागते. कृष्णा खोर्यातील वाया जाणारे पाणी उजनी आणि कोळगाव धरणात येणार असल्याने ही समस्या निर्माण होणार नाही. रिटेवाडी उपसासिंचन सारखी योजना ही होवू शकते. त्यामुळे करमाळा तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढणार आहे.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेचे श्रेय मिळू नये म्हणून काहींनी या योजनेस खूप विरोध केला. पण विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांनी याचा अविरत पाठपुरावा केला आणि आज निधी मंजूर झाला. करमाळा तालुक्याला याचा सर्वाधिक लाभ होणार आहे. सूर्य चंद्र असे पर्यंत विजयसिंह मोहिते पाटील यांच नाव या निमित्ताने आता घेतले जाईल.
शहाजीराव देशमुख,
(माजी उपाध्यक्ष आदिनाथ कारखाना)
- रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरीच्या जाचक अटी शिथिल करा- भाजप जिल्हा सचिव लक्ष्मण केकान
- करमाळ्यात मराठा कुणबी प्रकरणासाठी अडवणूक ; ऐजंट आणि अधिकाऱ्यांमध्ये मिलीभगत- युवासेनेचा धरणे आंदोलनाचा इशारा
- भाळवणीच्या तृप्ती वाघमारे चे नीट (NEET) परीक्षेत घवघवीत यश
- कुंभेजच्या बागल विद्यालयात केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धांचे आयोजन
- २०१४ ला २५७ चा मटका नव्हता, जनतेचा कौल होता! हे २०२४ लाही जनतेने दाखवून दिले ; विरोधकांना पाटील गटाचा “हाबाडा”