भाजप नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांचा गावभेट दौरा ; करमाळा तालुक्यातील गावांचा घेतला आढावा
करमाळा, दि. 25 (करमाळा-LIVE)-
भारतीय जनता पार्टीचे नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांचा माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा तालुक्यातील वाशिंबे, राजुरी, सावडी, भराटेवस्ती- सावडी, कोर्टी, विहाळ, वंजारवाडी या गावांचा गावभेट व संवाददौरा संपन्न झाला.
भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या लोककल्याणकारी योजना व धोरणांची माहीती देत केंद्र सरकार समाजातील शेवटच्या घटकांचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे ग्रामस्थांना सांगितले.
मतदारसंघातील जनतेच्या परिवारातीलच सदस्य असल्या प्रमाणे त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सांत्वनपर भेटी घेतल्या. तसेच या गावभेट दौऱ्यांच्या प्रसंगी मा.धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी ग्रामस्थांच्या समवेत संवाद साधला. त्यांच्या अडी-अडचणी प्रश्न जाणून घेतल्या व अगामी काळात देखील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी वचनबद्ध असल्याचे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सांगितले.
यावेळी जि.प.सदस्या सविताराजे भोसले, जिल्हा बँकेचे माजी संचालक भरतरीनाथ अभंग, अजित तळेकर, उदयसिंह मोरे-पाटील, संतोष खाटमोडे पाटील, अमरजित साळुंके, दीपक चव्हाण, जगदीश अग्रवाल, नरेंद्र ठाकूर, आबासाहेब टापरे, शाम सिंधी, ज्ञानेश्र्वर खाटमोडे, शिवाजी जाधव आदींसह स्थानीक अनेक मान्यवर पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
- रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरीच्या जाचक अटी शिथिल करा- भाजप जिल्हा सचिव लक्ष्मण केकान
- करमाळ्यात मराठा कुणबी प्रकरणासाठी अडवणूक ; ऐजंट आणि अधिकाऱ्यांमध्ये मिलीभगत- युवासेनेचा धरणे आंदोलनाचा इशारा
- भाळवणीच्या तृप्ती वाघमारे चे नीट (NEET) परीक्षेत घवघवीत यश
- कुंभेजच्या बागल विद्यालयात केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धांचे आयोजन
- २०१४ ला २५७ चा मटका नव्हता, जनतेचा कौल होता! हे २०२४ लाही जनतेने दाखवून दिले ; विरोधकांना पाटील गटाचा “हाबाडा”