करमाळा शहरातील पावसाळ्यापूर्वी स्वच्छतेची सर्व कामे जलदगतीने करावीत – जितेश कटारिया
करमाळा, दि. 21 (करमाळा-LIVE)-
पावसाळा सुरू होण्यापूर्वी करमाळा शहरातील सर्व नाले, शहरातील सर्व गटारीची आणि शहरातील रस्त्यांची साफसफाई करावी अशी मागणी भाजपा व्यापार आघाडी चे शहराध्यक्ष जितेश कटारिया यांनी केली आहे.
पावसाळा तोंडावर येऊन ठेपलेला आहे.शहरातील गटारीची आणि नाल्यांची दयनीय अवस्था झाली आहे. शहरामध्ये अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. शहराला लागून असलेल्या रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत रस्त्याच्या कडेने वेड्या वाकड्या बाभळी वाढलेल्या आहेत. अनेक नाल्यामध्ये भरमसाठ कचरा साचलेला आहे नाल्याच्या कडेने झाडी वाढलेली आहे.कित्येक ठिकाणी रस्त्याकडील नाल्याना संरक्षक कठडे देखील नाहीत त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडू शकते.तरी प्रशासनाने कोणताही निष्काळजीपणा न करता त्वरित नाले,गटारी आणि रस्त्याची साफसफाई करावी अशी मागणी भाजपा व्यापार आघाडी चे शहराध्यक्ष जितेश कटारिया यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.