भाजपच्या करमाळा शहराध्यक्ष पदी जितेश कटारिया यांच्या नावाची चर्चा
करमाळा, दि. 15 (करमाळा-LIVE)-
भारतीय जनता पार्टीच्या करमाळा शहराध्यक्ष पदी जितेश कटारिया यांच्या नावाची चर्चा सुरू असून कोणाची वर्णी लागणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
भारतीय जनता पार्टीत संघटना निवडी प्रत्येक तीन वर्षांनी होतात. यावेळी प्रथमच सोलापूर जिल्ह्याचे दोन विभाग करून दोन जिल्हाध्यक्ष निवड करण्यात येणार आहे. यामध्ये पश्चिम विभागात माळशिरस, करमाळा, बार्शी, सांगोला, माढा या तालुक्यांचा समावेश होऊ शकतो. या निवडी 20 मे ते 31 मे पर्यंत जिल्हाध्यक्ष निवडी जाहीर होण्याची शक्यता आहे. जिल्हाध्यक्ष पद निवडीनंतर तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष तसेच वेगवेगळे मंडळ अध्यक्ष निवडी केल्या जातात.
संघटनात्मक निवड प्रक्रिया मध्ये करमाळा तालुका आणि शहर अध्यक्ष पदाचे निवडी देखील होणार अस्न सध्याचे व्यापारी आघाडीचे विद्यमान शहराध्यक्ष जितेश कटारिया यांचे नाव शहराध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत. श्री कटारिया यांनी व्यापारी आघाडी पदाची जबाबदारी घेतल्यापासून भाजपचे संघटनात्मक काम करमाळा शहरामध्ये उत्तम रित्या पार केले आहे.
तसेच पक्षाचे विविध उपक्रम, राज्य व केंद्र सरकारच्या योजना लोकपर्यंत पोहचविणे, नागरिकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, आंदोलन या मध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे. नुकत्याच पार पडलेल्या श्रीराम नवमी धुमधक्यात साजरा करण्यामध्येहु त्यांचा मोलाची कामगिरी होती. श्री कटारिया त्यांच्या नंदन प्रतिष्ठान मार्फत वेळोवेळी लोकपयोगी कार्यक्रम घेत असतात. करमाळा शहरातील तसेच तालुक्यातील व्यापार पेठेमध्ये तसेच सर्व जुन्या नवीन पदाधिकारी यांच्याशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.
जितेश कटारिया यांच्याशी आम्ही फोन वरून चर्चा केली असता त्यांनी याबाबत सांगितले की, भाजप हा कोण्या व्यक्तीचा किंवा कुटुंबाचा पक्ष नसून सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जनतेचा भाजप वर विश्वास आहे. भाजप मध्ये सध्या मी व्यापारी आघाडीचे काम करीत आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ते काम आपण करण्यास तयार आहे.