करमाळा बसस्थानक आवारात सिमेंट काँक्रिटीकरणासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर- माजी आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती
![IMG_20220801_131001-4-1.jpg](https://karmalalive.in/wp-content/uploads/2023/08/IMG_20220801_131001-4-1.jpg)
![](https://karmalalive.in/wp-content/uploads/2023/07/IMG-20230718-WA0034-4.jpg)
![](https://karmalalive.in/wp-content/uploads/2023/07/IMG-20230708-WA0028.jpg)
जेऊर, दि. 1 (करमाळा-LIVE)-
करमाळा बसस्थानक आवारात सिमेंट काँक्रिटीकरण काम लवकरच सुरु होणार असून त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी आमदार नारायण पाटील यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती देताना श्री पाटील यांनी सांगितले की, गेली तीन वर्षे आपण या कामाचा पाठपुरावा करत होतो. यापूर्वी महाविकास आघाडी सरकार असताना आपण या कामास 1 कोटी 89 लक्ष रुपये इतका निधी मंजूर करुन घेतले. परंतु नंतर मात्र तांत्रिक अडचणी येत राहिल्या व या कामास निविदा काढण्यात येऊनही सुरुवात झाली नाही. यानंतर मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे हे विराजमान झाल्यापासून आपण या कामासाठी परत पाठपुरावा सुरु केला. पहिली मंजूरी स्थगिती यादीत अडकल्याने नवीन प्रशासकीय मंजूरी घेऊन या कामास आता दोन कोटी रुपये खर्च करता येणार असून यात करमाळा बसस्थानक आवारातील संपूर्ण भागाचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. करमाळा हे अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद व बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेले बसस्थानक असल्याने या ठिकाणी प्रवाशांची व वाहनचालकांची होत असलेली गैरसोय दुर होणे गरजेचे होते.
यापूर्वी सन 2014-15 मध्ये माझ्या आमदारकीच्या कालावधीत करमाळा व कुर्डूवाडी बसस्थानकांचे नुतणीकरण झाले असून आता नव्याने अपुरी कामे पूर्ण करण्यात आपणास यश आले असून याकामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे. लवकरच करमाळा बसस्थानक परिसरातील आवार हे खड्डेमुक्त होऊन सुसज्ज असे बसस्थानक प्रवाशांच्या सोईसाठी सज्ज असेल. जेऊर येथील बसस्थानक नूतणीकरणासाठी आपण शासनाकडे दोन कोटी रुपयांचा निधी मागितला असून या कामाचाही पाठपुरावा चालू आहे. करमाळा बसस्थानक आगारातील तांत्रिक विभागातील कर्मचारी रिक्त पदे, आगारास नवीन बसगाड्या तसेच लांबपल्यासाठी शिवशाही बसेसची मागणी आपण केली असून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आपण चर्चाही केली असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.
![](https://karmalalive.in/wp-content/uploads/2023/07/IMG-20230730-WA0024-2.jpg)
![](https://karmalalive.in/wp-content/uploads/2023/07/IMG-20230709-WA0029.jpg)
![](https://karmalalive.in/wp-content/uploads/2023/07/IMG-20230722-WA0034.jpg)
![](https://karmalalive.in/wp-content/uploads/2023/05/IMG-20230531-WA0011.jpg)