चिखलठाण : सीमेवरील जवानांना राख्या पाठवून रक्षाबंधन साजरी तर सीमेवरील जवानांकडून मारकड वस्ती शाळेस अनोखी भेट
करमाळा, दि. 6 (करमाळा-LIVE)-
चिखलठाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मारकड वस्तीच्या शाळेतील विद्यार्थिनींनी सीमेवरील जवानांना राख्या पाठवल्या होत्या. या पाठवलेल्या राख्यांबद्दल आभार व्यक्त करत सध्या राजस्थान येथे कर्तव्य बजावत असलेले शेलगावं येथील जवान दत्तात्रय महामुनी यांनी सर्व विद्यार्थ्यांना शालेय दप्तर भेट दिले.
यावेळी पालक हनुमंत आरकिले, गणेश मारकड, शिवाजी साळुंखे, रोहित मारकड, संदीप चौबे, रोहित गव्हाणे, प्रताप चौबे आदी उपस्थित होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तात्यासाहेब जगताप यांनी सैनिकांबद्दल अधिक माहिती दिली तर शिक्षिका स्वाती पाटील यांनी आभार मानले.