08/06/2025

चिखलठाण : जमिनीच्या कारणावरून महिलेस मारहाण ; तिघांविरूध्द गुन्हा दाखल

0
IMG-20221210-WA0012-2-2-1.jpg

चिखलठाण, दि. 9 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथे एका महिलेला आणि तिच्या मुलाला आणि मुलीला तिघांनी लोखंडी गजाने मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार ६ फेब्रुवारीला सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान घडलेला असून सदरील प्रकरणी तिघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबतची हकीकत अशी की, चिखलठाण येथील सुरेखा तुकाराम नेमाने यांनी फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीत सांगितले आहे की, चिखलठाण येथील लांडहिरा भागात माझ्या नावे असलेली ३० गुंठ्ठे जमिनीत हिस्सा दे म्हणून फिर्यादीचा दीर बापूराव बाबा नेमाणे, पुतण्या काळू बापूराव नेमाणे व तानाजी बापूराव नेमाणे हे घरासमोर आले.
गुंठ्ठे पूर्वी वाटप झालेले असताना आता जमीन कशी वाटप करून देऊ असे म्हणाले असता यावेळी तिघांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मला व मुलगी अंजली नेमाणे, मुलगा मयुर नेमाणे यास मारहाण करून जखमी केले.

सदरील प्रकरणी पोलिसांनी तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. सध्या याचा तपास सुरू आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page