चिखलठाण येथील सुराणा विद्यालयातील शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान ; AI अभ्यासक्रमाचे उद्घाटन

चिखलठाण, दि. १२ (करमाळा-LIVE)-
चिखलठाण येथील श्रीमती रामबाई बाबुलाल सुराणा विद्यालयात इयत्ता आठवीतील शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान बैलगाडीतून मिरवणूक काढून करण्यात आला यावेळी एआय (AI) या आधुनिक अभ्यासक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांची गावातून पारंपारिक पध्दतीने बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली तसेच नंतर विद्यालयामध्ये त्यांचा सत्कार समारंभ त्यांच्या माता- पालकांच्या उपस्थितीत करण्यात आला.
एआय (AI) उपक्रमाचे उद्घाटन माजी जि.प उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संदिपान बारकुंड, भाऊसाहेब गव्हाणे उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी श्री बारकुंड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना इतरही विद्यार्थ्यांनी असाच अभ्यास करून आपले व शाळेचे नाव उंचवावे असे आवाहन केले.
यावेळी विद्यार्थी व गुणवंत विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी मनोगत व्यक्त केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक वायदंडे सर यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले.