करमाळा शहरातील सर्व रस्ते डांबरीकरण करण्यासाठी १८ कोटींचा प्रस्ताव तयार करा ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश- माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांच्या प्रयत्नांना यश

करमाळा, दि. २९ (करमाळा-LIVE)-
करमाळा शहरातील रस्ते दुरुस्ती तातडीने गरजेचे असून गेली दहा वर्षात मोठ्या प्रमाणावर निधी न मिळाल्यामुळे सर्व प्रलंबित कामे असून यासाठी १८ कोटी रुपयांची मागणी नगरपालिकेने केली होती याचा पाठपुरावा करून माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी याबाबत मंत्रालयात उपमुख्यमंत्री विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी जयंत भाऊ का आले नाही असा प्रश्न विचारून तात्काळ या निवेदनावर कारवाई करण्याची लेखी आदेश देऊन नगर विकास २२ चे सचिव श्री सहस्त्रबुद्धे यांना भ्रमणध्वनी वरून फोन करून तात्काळ निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या.
मंत्रालयात शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, वैभवराजे जगताप, प्रसिद्ध उद्योजक बाळासाहेब बलदोटा यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, उद्योग मंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, शिवसेना सचिव संजय मोरे, यांच्या गाठीभेटी घेऊन शहर व तालुक्यातील विविध मागण्यांची निवेदन दिली.
करमाळा शहर तालुक्यातील सर्व निवडणुका धनुष्यबाणावर लढवणार असून त्या निवडून असा मी शब्द आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला असून तालुक्यातील शेवटच्या घटकापर्यंत शिवसेना मजबूत करण्यासाठी मी व माझे सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर वैभवराजे जगताप यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली.