करमाळा विधानसभा मतदारसंघात रविवारी शिंदे-ठाकरे गटाची तोफ धडाडणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करमाळ्यात येणार तर सुषमा अंधारे यांची कुर्डूवाडीत सभा


करमाळा, दि. 23 (करमाळा-LIVE)-
करमाळा मतदारसंघात रविवारी शिंदे-ठाकरे गटाची तोफ धडाडणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी 25 डिसेंबरला करमाळा तालुक्यातील आदिनाथ कारखान्याच्या गळीत हंगाम आणि नियोजन बैठकीसाठी येणार आहेत तर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या, प्रमुख वक्त्या सुषमा अंधारे यांची कुर्डूवाडी येथे महाप्रबोधन यात्रा निमित्ताने जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यातील राजकारण चांगलेच तापणार आहे.
