07/06/2025

करमाळा मतदारसंघाची जागा भाजप ला मिळवी ; करमाळ्यातील शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

0
IMG-20241022-WA0042.jpg

करमाळा, दि. २२ (करमाळा-LIVE)-
भारतीय जनता पार्टीचे विधानसभेचे उमेदवार यादी जाहीर झाली परंतु अजूनही काही जागा जाहीर होणे बाकी आहेत यातच आज करमाळा विधानसभेला भारतीय जनता पार्टीला जागा सोडण्यात यावी व भाजप च्या निष्ठावान आणि विश्वासू कार्यकर्त्याला संधी मिळावी अशी मागणी करमाळ्यातील शिष्टमंडळाने आज माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे सागर बंगला मुंबई येथे केली

त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या. यावेळी गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या भेटी दरम्यान दीपक चव्हाण, जितेश कटारिया, सरपंच अंकुश शिंदे, संजय घोरपडे, किरण बोकन, नरेंद्रसिंह ठाकुर, मनोज कुलकर्णी, संतोष कांबळे आदी जणांनी भेट घेऊन सध्या परिस्थिती सांगितली.

यावेळी कार्यकर्त्याच्या भावनेचा विचार करून योग्य निर्णय घेऊ असे शिष्टमंडळाला आश्वासित केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page